श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम

"ज्ञानं शक्तिं च मोक्षं च, यत्र तत्र समाश्रिता। तां देवि प्रणतोऽस्म्यहम्, या ब्रह्मसाक्षात्कारिणी॥"

























गुरु रेवती (माई)
'माई' अशा संबोधना ने प्रेमळपणे संबोधल्या जाणाऱ्या गुरु रेवती या आध्यात्मिक गुरु, आंतरराष्ट्रीय स्तराच्या वास्तु विशेषज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या ज्ञान आणि निस्वार्थ सेवेच्या प्रवासाने असंख्य जीवनांना स्पर्श केला आहे. त्यांचे गुरु स्थान आदिगुरु श्री दत्तात्रय, आडवंगी नाथ, गुरु गोरक्षनाथ, श्री स्वामी समर्थ तसेच कलावती आई सुद्धा त्यांच्या साठी आदरणीय आहेत आणि त्यांच्या शिकवणीचा माईंच्या जीवनावर खोल वर प्रभाव पडला.
दैवी कृपा आणि आदेश जगदंबेचा
माईंना आई तुळजा भवानीने प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांच्यावर कृपा केली आणि हातात दैवी कवडी देऊन समाज कल्याणासाठी निस्वार्थ सेवा कर असा आदेश दिल्या पासून माईंनी आपले सर्वस्व त्यागून समाज सेवे साठी वाहून घेतले. हा प्रवास मागील 19 वर्षांपासून अविरत चालू आहे.
कार्य आणि कर्तुत्व
गुरु रेवती माई दिव्य कौडी शास्त्र मध्ये आई जगदंबेच्या कृपेने पारंगत आहेतच पण सोबत त्यांनी ज्योतिष, वास्तु, dowsing, अंकशास्त्र, मंत्र विज्ञान मध्ये सुद्धा स्वताचे कौशल्य पणाला लाऊन एक नवीन ओळख निर्माण केली आहे.आज गुरु रेवती माई या श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम इथे संचालिका आणि शक्तिपिठाधीश पदावर सज्ज आहेत. त्यांचे वास्तूमधील कौशल्य आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते. याव्यतिरिक्त, माई असंख्य NGO मध्ये सक्रिय मंडळ सदस्य आहे. त्या अनेक शिष्यांच्या आध्यात्मिक गुरु आहेत.
समाज कार्य आणि प्रभाव
गुरु रेवती (माई) यांची सामाजिक कार्याची बांधिलकी प्रगल्भ आणि बहुआयामी आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन: भोंदूगिरी आणि चुकीच्या चालीरिती दूर करण्यासाठी समाजात जागृती निर्माण करणे.
अध्यात्मिक जागरूकता: अध्यात्म आणि आंतरिक शांतीची सखोल समज वाढवणे.
महिला सक्षमीकरण: लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे आणि महिलांना भरभराटीच्या संधी उपलब्ध करून देणे.
पर्यावरण वाचवा: पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत पद्धतींचा पुरस्कार करणे.
नैराश्याशी लढा: मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्यांना समर्थन आणि मार्गदर्शन प्रदान करणे.
शेतकरी आत्महत्या रोखणे: शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि कृषी क्षेत्रातील संकटाची मूळ कारणे दूर करण्यासाठी कार्यक्रम राबवणे.
दृष्टी आणि वारसा
गुरु रेवती (माई) ची दृष्टी एक सामंजस्यपूर्ण जग निर्माण करणे आहे जिथे अध्यात्मिक जागृती आणि मानवतावादी प्रयत्न सर्व प्राण्यांच्या प्रगतीसाठी नेतृत्व करतात. त्यांचा वारसा म्हणजे निस्वार्थ करुणा, सशक्तीकरण आणि समाजाच्या भल्यासाठी अटळ समर्पण. त्यांच्या शिकवणी आणि कृतींद्वारे, माई असंख्य लोकांना उद्दिष्ट आणि सेवेचे जीवन जगण्यासाठी प्रेरित करत आहेत.
श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम (महाशक्तीपीठ)
श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम ही सेवाभावी संस्था विविध सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. सनातन संस्कृतीच्या गाभ्यातील शुद्ध ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्याचे हे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
अन्नदान – भुकेल्यांना अन्न हीच ईश्वरसेवा
अन्नदान हे सर्वात मोठे पुण्य समजले जाते, आणि श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम या कार्यात नेहमी अग्रेसर असते. गरजू, गरीब, साधू-संत, भिक्षुक, तसेच सेवेकरी आणि भक्तांसाठी नियमित अन्नदान सेवा केली जाते. "कोणीही उपाशी राहू नये" हा संस्थेचा दृढ संकल्प आहे. सतत चालणाऱ्या अन्नदान उपक्रमात सहभागी होऊन आपणही पुण्यसंचय करू शकता.
आध्यात्मिक जागरूकता – देवी भक्तांसाठी प्रकाशाचा किरण
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि सर्व देवीभक्तांसाठी शक्तिपीठ आणि देवीतत्त्व यांची खरी माहिती पोहोचवण्याचे कार्य श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम करत आहे. समाजातील अंगात संचार येणे, वारे उभे राहणे या क्षेत्रात होणाऱ्या फ सवणुकीला आळा घालण्याचा संस्थेचा संकल्प आहे. शक्ती ही भयासाठी नसून भक्तांच्या कल्याणासाठी आहे, हे पटवून देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
स्त्रीशक्ती जागरूकता – देवीचा जागर
स्त्री ही अबला नसून, ती शक्तीस्वरूपा आहे! हे अधोरेखित करून स्त्रियांना मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी गुरु रेवती (माई) अहोरात्र कार्यरत आहेत. आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मान या दोन महत्त्वाच्या घटकांद्वारे स्त्रियांना त्यांच्या अखंड शक्तीचा साक्षात्कार घडवणे ही सं स्थेची प्राथमिकता आहे.
गाईंचे रक्षण आणि पालन – गोसेवेचा संकल्प
भारतीय संस्कृतीत गोमातेचे स्थान अत्यंत पूजनीय आहे. त्यांचे संरक्षण, संगोपन आणि सेवा करणे ही संस्था गुरु रेवती (माई) यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. गोशाळा निर्माण करून निराधार गाईंना निवारा आणि सेवा प्रदान करण्याचे कार्य येथे सातत्याने सुरू आहे.
स्त्रीशक्ती जागरूकता – देवीचा जागर
समाजात अजूनही काही अशास्त्रीय आणि निराधार श्रद्धा पसरलेल्या आहेत. शास्त्राधारित ज्ञानाचा प्रसार करून, विज्ञान व आध्यात्म यांचा समतोल साधत अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्यासाठी ही संस्था अहोरात्र प्रयत्नशील आहे. समाज प्रबोधन हे संस्थेचे ध्येय आहे.
महाशक्तिपीठ – एक क्रांती!
श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम ही केवळ एक संस्था नाही, तर समाजात नवचैतन्य निर्माण करणारी शक्ती आहे. आध्यात्मिक जागरूकता, स्त्रीशक्ती सन्मान, गोसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलन या चार मुख्य स्तंभांवर ही चळवळ उभी आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या कार्यात आपलीही साथ द्या आणि समाजाच्या विकासासाठी योगदान द्या!