प्राचीन मंत्र आणि त्याची साधना अगदी मोफत | Mantra Sadhana
- भक्ति पारेगावकर
- Aug 11, 2024
- 2 min read
Updated: Nov 3, 2024

आजच्या धावपळीच्या युगात शांती,चिंतन,मनन यासाठी वेळ मिळणे खूप अवघड झाले आहे. स्वतःसाठी आपण तासभर पण वेळ देऊ शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे. घड्याळाप्रमाणे नुसतीच पळापळ करतो आपण पण साध्य तर काहीच होत नाही. पैसा मिळतो पण शांती, समाधान मिळत नाही. घरातल्या लोकांची मर्जी सांभाळतो पण आपल्या मनाचे काय? खूप प्रश्नाचे काहूर मनात सुरू असते आणि नकळत मनावर ताण पडतो आणि मग सुरू होतो तो देवाचा धावा. पण त्यासाठी तरी कुठे वेळ मिळतो? रात्री अंथरूणात पडल्यावर श्रीकृष्ण शरण मम म्हणत झोपून जायचे.

या गोष्टीवर पर्याय म्हणजे श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम आणि ISPDHAAM Foundation. अगदी कोणत्याही प्रकारची अवघड साधना सहज सोप्या पद्धतीने इथे करायला मिळते आणि ते सुद्धा अगदी मोफत. आपल्यातले बरेचसे लोक अध्यात्म जाणतात पण अध्यात्माचे महत्त्व जाणून घेत नाहीत. नुसतेच जपजाप्य करून काही साध्य होत नाही तर त्याला frequency जुळणे पण गरजेचे असते. या शक्तिपीठाने प्राचीन मंत्र आणि त्याची साधना अगदी मोफत उपलब्ध केली आहे. ही साधना आध्यात्मिक विकासासाठी खूप महत्त्वाची ठरत आहे, प्रेरणादायी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वैज्ञानिक आधार असला तरी त्याच्या जोडीला अध्यात्म असणे पण गरजेचे असते. विज्ञानाच्या पलीकडे पण एक अज्ञात शक्ति आहे आणि ती शक्ति कशी मिळवायची याचे संपूर्ण मार्गदर्शन हे श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम आणि ISPDHAAM Foundation करते. साधना अगदी मोफत दिल्या जातात आणि मार्गदर्शनाखाली करून घेतल्या पण जातात. इथे खोटेपणा चालत नाही. एकाग्रतेने जेवढी साधना कराल तेवढी शांती आणि संतुलन मिळेल. अखंड लक्ष्मी साधना, महारुद्र भैरव साधना अशा मोफत साधनाचा लाभ अनेक साधक घेत आहेत.

या श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम मध्ये गुरू रेवती माई आणि ISPDHAAM Foundation चे शिवांश जमदग्नि दादा ह्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभते.
गुरू रेवती माई एक असे व्यक्तिमत्त्व आहे की साक्षात जगदंबा स्वरूप!! खूप लाघवी आणि प्रसन्न मातेचे स्वरूप!! तिच्या कुशीत मन मोकळं होत जणू काही!! नुसते त्यांचे मुखदर्शन झाले तरी खूप प्रसन्न वाटते... कायम हसरा चेहरा जणू काही देवी आशिर्वाद देत आहे. एखाद्याची परिस्थिती एकून टचकन डोळ्यात पाणी येणारी ही माऊली म्हणजे साक्षात जगदम्बेचा अवतारच आहे. आपल्या बोलण्यातून जणू काही मोत्यांच्या राशी उधळतात!!! खरच दैवी रूप म्हणतात ना ते हेच असावं!!!
शिवांश जमदग्नि दादा म्हणजे नावाप्रमाणेच साक्षात शिवाचार्य!!! तुमचा कोणताही प्रश्न असो त्या प्रश्नाला उत्तर हे तयारच असते मग तो कितीही गहन प्रश्न असो साधकाचे समाधान झालेच पाहिजे असे उत्तर तयार असते!!!
अशा या श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम आणि ISPDHAAM Foundation मी जोडली गेली आहे हे मी माझे सौभाग्य समजते.
हेमलता शहा - सपकाळ सदस्या, पुणे
Unique ID : ISD01SPUF009983
प्राचीन मंत्र आणि त्याची साधना अगदी मोफत | Mantra Sadhana
Comments