"न्याता" म्हणजे "विश्वासार्ह नाते"
- गुरु रेवती (माई)
- 6 days ago
- 2 min read
Updated: 6 days ago
!! जय जगदंब !!
जीवनाच्या वाटेवर अनेक वळणे असतात, काही सोपी, काही कठीण. पण या प्रवासात आपल्याला सोबत करणारा, आपल्या सुख-दुःखाचा साथीदार मिळावा ही प्रत्येक मनाची स्वाभाविक इच्छा असते. आजच्या जगात आधुनिकतेच्या प्रवाहात कित्येक जण हरवलेत, नातेसंबंध केवळ व्यवहार बनलेत, आणि भावनिक नात्यांना खरी किंमत उरली नाही.
पण कधी तरी मनाच्या कोपऱ्यात एक विचार येतो – खरंच, आपल्याला असा जोडीदार हवा ना, जो आपल्या विचारांशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या श्रद्धेशी आणि आपल्या ध्येयाशी जुळणारा असेल? जो केवळ भौतिक सुखांसाठीच नव्हे, तर आपल्या आध्यात्मिक प्रवासातही साथ देईल?
हा प्रश्न विवाहाचा विचार मनात येताच मुला मुलींच्या मनात येतोच. पण बाहेरच्या जगात भावनेला आजकाल जास्त स्थान दिले जात नाही आहे. कित्येक लग्न ६ महिन्याच्या आतच मोडतात. कित्येक जण लग्नासाठी प्रयास करत आहेत पण लग्न जुळत नाहीये. योग्य स्थळ मिळत नाहीये म्हणून कित्येक मुले आणि मुली अविवाहित आहेत. जर कुंडली मध्ये भाग्य मध्ये काही दोष असेल तर त्याचे योग्य निराकरण करून मार्गदर्शन करणारे समाजात कोणी खंबीर उभे नाहीये. याचाच सर्व बाजूंनी विचार करून श्रीक्षेत्र शक्तिपीठ धाम या संस्थेच्या संकल्पनेतून एक सेवाभावी उपक्रम सुरू करण्याचा निर्णय येणाऱ्या नवीन वर्षात घेतला आहे. ज्यात विवाह इच्छुक मुलामुलींची नोंदणी संस्थेच्या न्याता या उपक्रमात करून त्यांच्या विवाहात येणारे आध्यात्मिक अडथळे दूर करून त्यांचे भविष्य आध्यात्मिक आणि भौतिक दृष्टीने उज्वल कसे होईल या साठी निर्माण करण्यात आलेले आहे.
‘न्याता’ हा श्रीक्षेत्र शक्तीपीठ धाम (महाशक्तीपीठ) च्या सेवाभावी वृत्तीतून आलेला उपक्रम आहे, जो केवळ विवाह जुळवणीसाठी नसून, सद्गुणी, धर्मपरायण आणि समाजसेवेच्या भावनेने बांधलेल्या व्यक्तींना एकत्र आणण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
"न्याता" म्हणजे "विश्वासार्ह नाते" – एक असे नाते जे श्रद्धा, धर्म, संस्कृती आणि सत्यतेच्या आधारावर उभे आहे.
इतर मॅट्रिमोनियल वेबसाइट आणि "न्याता" मध्ये काय फरक आहे?
१. "न्याता" ही व्यावसायिक दृष्टिकोनातून बनवण्यात आलेली संकल्पना नसून पूर्णपणे समाजसेवेसाठी सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे.
२. "न्याता" मध्ये केवळ सनातन हिंदू धर्मियांना नोंदणी करण्याची परवानगी आहे. येथे फक्त पारंपरिक हिंदू धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश आहे – कारण विवाह हा फक्त समाजातील बंधन नव्हे, तर एक धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे.
३. "न्याता" मध्ये देण्यात आलेली देणगी ही गोसेवा, अन्नदान, समाजसेवा, धार्मिक कार्यक्रमात वापरली जाणार आहे आणि पूर्णपणे पारदर्शकता यात असणार आहे. येथे नफा मिळवण्याचा हेतू नाही याउलट मुलामुलींच्या हातून गोसेवा अन्नदान सारखे पुण्य करवून त्यांच्या जीवनात आध्यात्मिक वृत्तीचा पाया रचल्या जात आहे.
४. नोंदणी झालेल्या मुलामुलींची जन्म पत्रिका बनवून, अभ्यासून त्यांना स्वतः संस्थेच्या शक्तिपीठाधीश पदी असलेल्या गुरु रेवती (माई) मार्गदर्शन करणार आहेत.
५. येथे बनावट प्रोफाइल्सना जागा नाही कारण प्रेम आणि विश्वास हे फसवणुकीच्या आधारावर उभे राहू शकत नाहीत.
विवाह केवळ दोन व्यक्तींचे नव्हे, तर दोन आत्म्यांचे, दोन कुटुंबांचे आणि दोन संस्कृतींचे एक पवित्र मिलन असते. म्हणूनच, ‘न्याता’ फक्त वर-वधू जुळवण्याचे काम करत नाही, तर त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आध्यात्मिक आधार देण्याचा प्रयत्न करतो.
संस्कार, विश्वास आणि सुरक्षितता
आज अनेक विवाह संकेतस्थळे उपलब्ध आहेत, पण ‘न्याता’ची खासियत वेगळी आहे – येथे व्यवहाराला जागा नाही, फक्त संस्कार आहेत. येथे व्यावसायिक दृष्टिकोन नाही, तर निःस्वार्थ सेवेचा भाव आहे.
गुढीपाडव्याच्या या मंगलदिनी उपक्रमाची सुरुवात होत आहे. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने उदयास आलेल्या या संकल्पनेला नवीन वर्षात सगळ्यांसमोर मांडत आहे.
योग्य निर्णय घ्या, योग्य जोडीदार निवडा आणि आपल्या जीवनाला एक सुंदर आणि जगदंबेच्या आशीर्वादाने आध्यात्मिक वळण द्या!
!! जय जगदंब जय भवानी !!
Comments